अनेक वर्षांपासूनचे पुणेकरांचे स्वप्न पूर्ण, लोकल धावली 100 किमी वेगाने | Lokmat Marathi News

2021-09-13 19

तशी 100 किलोमीटर वेगाने धावणारी लोकल सोमवारी पुण्याहून लोणावळ्याला रवाना झाली. एवढ्या वेगाने धावू शकणारी पुणे विभागातील हि पहिलीच लोकल आहे. येत्या काळात या प्रकारच्या आणखी लोकल दाखल होणार असल्याने लोकल प्रवासाची नवीन इनिंग सुरु होणार आहे. पुणे रेल्वे येथे खासदार अनिल शिरोळे व श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लोकलला सकाळी नऊ वाजुन 55 मिनिटांनी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. खासदार अनिल शिरोळे म्हणाले कि पुणे लोणावळा प्रवास करणाऱ्यांसाठी हि लोकल अतिशय आरामदायी आहे ती प्रवाश्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. पुणे विभागात हि लोकल सुरु होणे हि घटना सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखी घटना आहे. या लोकलमुळे प्रवाश्यांच्या प्रवासाची वेळ खूप कमी होणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews